आता एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 9 महिने प्रसूती रजा !

आता एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 9 महिने प्रसूती रजा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजेसोबत आता 3 महिने अतिरिक्त पगारी प्रसूती रजा मिळणार आहे. म्हणजेच 6 महिने हक्काची रजा आणि त्यासोबत 3 महिने अतिरिक्त रजा, अशी एकूण 9 महिन्यांची प्रसूती रजा आता एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मातृत्त्व कोणत्याही स्वरुपात हिरावून घेतलं जाऊ नये, त्याचा सन्मान झालाच पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या या निर्णयामुळे फटाके फोडून आनंद साजरा केला. एसटीतील 70%   महिला वाहकांचा गर्भपात होत असल्याच्या अहवाल समोर आला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाना हा निर्णय घेतला आहे.

 

.

 

COMMENTS