‘स्वाईन फ्लू’ मुळे भाजपच्या महिला आमदाराचा मृत्यू

‘स्वाईन फ्लू’ मुळे भाजपच्या महिला आमदाराचा मृत्यू

जयपूर – राजस्थानमधील सत्तारूढ भाजपच्या आमदार किर्ती कुमारी (वय 50) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्या बिजोलिया राजघराण्याच्या सदस्या होत्या. स्वाईन फ्लूच्या लागणीमुळे श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने कुमारी यांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना काल उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. तिथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील मांडलगढ मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कुमारी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. कुमारी यांच्या निधनामुळे त्यांच्या मतदारसंघात शोककळा पसरली. स्वाईन फ्लूने एका आमदाराचेच निधन झाल्याने राजस्थानमधील आरोग्यविषयक धोरणांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहण्याची शक्‍यता आहे.

 

COMMENTS