आता ‘बेस्ट’ बसेस कंडक्टरविना धावणार

आता ‘बेस्ट’ बसेस कंडक्टरविना धावणार

मुंबईत आता बेस्ट बसेस कंडक्टर विनाच धावणार आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी आता मुंबईत लवकरच इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे.   त्यामुळे कंडक्टरशिवाय धावणारे बसेस मुंबई हे देशातील पहिले शहर असेल. अशी माहिती बेस्टचे व्यवस्थापक जगदिश पाटील यांनी दिली.

प्रवाशांना स्मार्ट कार्डच्या मदतीने किंवा तिकीट वेंडिंग मशीनच्या आधारे प्रवासी तिकीट काढू शकणार आहेत. त्यामुळे बेस्ट बसेसमध्ये कंडक्टरची गरज भासणार नाही.

मुंबईत बेस्ट प्रशासनाकडून 50 वातानुकूलित मिनी बसेस सुरु करण्यात येणार आहेत. या बसेसची क्षमता 29 प्रवाशांची (22 आसने आणि 7उभे प्रवासी) अशी असेल. या मिनी बसेस भाडे तत्त्वावर घेण्यात येणार असून त्या ठराविक मार्गांवर चालवल्या जातील. या बसमध्ये चढताना प्रवाशांना दाराजवळ मशीनसमोर पास किंवा कार्ड दाखवावे लागेल. ‘जर मशीनने कार्ड स्वीकारले नाही, तर संबंधित व्यक्तीला बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. या मशीनमध्ये पैसे जमा केल्यावर प्रवाशांना तिकीटदेखील मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र सध्या यावर काम सुरु आहे,’ असे बेस्टचे व्यवस्थापक जगदिश पाटील यांनी म्हटले.

यासोबतच बेस्ट बसेस कंडक्टरशिवाय धावल्यास प्रत्येक फेरीमागील खर्चात घट होईल. त्यामुळे त्याचा फायदा बेस्ट प्रशासनाला होणार आहे. ‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमच्या वापरामुळे प्रवाशांना प्रत्येक किलोमीटरसाठी येणारा खर्च 50 रुपयांवरुन 30 रुपयांवर येईल हा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

COMMENTS