आता रेल्वे अॅपवरुन करा विमानाचं तिकीट बुक

आता रेल्वे अॅपवरुन करा विमानाचं तिकीट बुक

आता रेल्वे अॅपवरुन विमान तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वेकडून या आठवड्यात नवे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून हमालाची सेवा घेणे, विश्रांतीगृह बुक करणे, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे या सेवा ही मिळणार आहे.
प्रत्येक सेवेसाठी मोबाईल वापरकर्त्यांना रेल्वेच्या अॅप शोधून ते डाऊनलोड करावे लागतात. मात्र प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्यासाठी नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा एकाच अॅपवर मिळणे गरजेचे होते. नव्या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सर्व सुविधांसोबतच टॅक्सी बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटदेखील बुकिंग करण्यात येणार आहे, या अॅपची निर्मिती रेल्वेच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारी असलेल्या ‘क्रिस’कडून करण्यात आली आहे. या अॅपसाठी सात कोटींचा खर्च आला आहे अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

COMMENTS