रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर; मात्र ‘मातोश्री’वर जाणार नाही ?

रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर; मात्र ‘मातोश्री’वर जाणार नाही ?

भाजपप्रणित एनडीएने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. रामनाथ कोविंद हे 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ‘मातोश्री भेटी’ चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.

एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांची घोषणा केली. यावेळी शिवसेना वगळता एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळले होते. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. ही बाब भाजपाला खटकली होती. त्यामुळेच की काय मुंबई दौ-यावर येणारे रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही मातोश्रीभेटीचा उल्लेख नाही.

COMMENTS