बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी होणार जाहीर

बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी होणार जाहीर

बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख सोमवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. त्यामुळे आठवडाभरापासून विद्यार्थी व पालक बारावीच्या निकालाची तारीख कधी जाहीर होणार याची वाट पाहत असून त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 

शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी मंडळातर्फे तयारीचा अंतिम आढावा घेतला जाईल आणि त्याच दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असे गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 किंवा 31 तारखेला बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

COMMENTS