उद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, काय झाली दोघांमध्ये चर्चा ?

उद्धव ठाकरेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, काय झाली दोघांमध्ये चर्चा ?

मुंबई –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत यामध्ये कुठलीली राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. मात्र या भेटीवरुन वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

राष्ट्रपतीपदाची येत्या जुलैमध्ये निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडूण येऊ शकतो. भाजपकडून लालकृष्ण अडवाणींसह विविध नावांची चर्चा सध्या सुरू आहे. प्रणव मुखर्जी यांची कामगिरीही चांगली झाली आहे. कुठलाही वादविवाद त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला नाही. त्यामुळेच पुन्हा ते या पदासाठी इच्छुक असले तर शिवसेनेचा पाठिंबा असेल असं आश्वासन ठाकरे यांनी मुखर्जी यांना दिलं असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्यावेळी मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्राच्या विधीमंडळात गेले 9 दिवसांपासून शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्दावर रणकंदन सुरू आहे. गोंधळामुळे 9 दिवसांपासून कोणतही कामकाज झालेलं नाही. शरद पवार यांनी या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी मोदींची भेट घेऊन त्यांच्याकडे कर्जमाफीची मागणी केलीय. आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचं शिष्टमंडळ दिल्लीत कृषीमंत्री आणि अर्थमंत्र्यांची भेट घेण्यासाठी रवाना झालं आहे. त्याआधीच ठाकरे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडला असण्याची शक्यता आहे.

COMMENTS