रवी शास्त्रींच्या फिरकीवर नरेंद्र मोदींची फटकेबाजी

रवी शास्त्रींच्या फिरकीवर नरेंद्र मोदींची फटकेबाजी

 

 उत्तर प्रदेशात मिळालेल्या ऐतिहासीक विजयाबद्दल माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरुन खास शास्त्री स्टाईलने अभिनंदन केले. त्याला मोदींनी त्याच पद्धतीने शास्त्रींना उत्तर दिले. रवी शास्त्रींनी त्यांच्या ऑफिसीएल ट्विटर अकाऊंट @RaviShastriOfc वरुन मोदी  आणि अमित शहा या जोडीने  उत्तर प्रदेशात जागांचे त्रिशतक ओलांडून विरोधकांना भुईसपाट केले अशा क्रिकेटच्या मार्मिक भाषेत टिप्पणी केली.

“Congratulations @BJP4India on the landslide win in UP. The pair of PM @narendramodi & @AmitShah went past 300-mark like a #TracerBullet,” Shastri wrote on his twitter page tagging official twitter handles of PM Modi and BJP president Amit Shah.
रवी शास्त्री यांच्या या फिरकीला नरेंद्र मोदी यांनीही तेवढ्याच समर्पकपणे उत्तर दिलंय. प्रचारात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला मात्र सरतेशेवटी खरा विजय हा लोकशाहीचा झाला आहे, या भाषेत शास्त्रींची फिरकी टोलावली.

Modi’s response was in typical Shastri style. “Thank you. UP polls did not quite go down to the wire. But, at the end of the day democracy is indeed the real winner! :”

COMMENTS