उस्मानाबाद: धनगर समाजाचे जोडे मारो आंदोलन

उस्मानाबाद: धनगर समाजाचे जोडे मारो आंदोलन

उस्मानाबाद : धनगर समाज आरक्षणास व स्वतंत्र ओबीसी मंत्रालयास नकार दर्शविणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून जिल्ह्यातील धनगर समाजातील नागरीकांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मारो आंदोलन केले.  धनगर समाजाच्या वतीने शिवाजी चौकात सकाळी 11 वाजता मोदी व फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच सकारात्मक निर्णय लवकरात लवकर न झाल्यास तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.

सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आंदोलनात आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनमध्ये धनगर समाजास आरक्षण देवू, तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे असे सांगितले होते. त्यानंतर *सोलापूर आणि बारातमीच्या* जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाज खूप मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते एस.टी. चे आरक्षण आम्ही देणारच, ही भूमिका मांडली होती. नंतर महाराष्ट्रात जे सत्ता परीवर्तन झाले ते धनगर समाजामूळे व मला पदही मिळाले तेही धनगर समाजामूळेच. अशी भूमिका नागपूर मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.

पण सरकार येवून निम्मा कार्यकाळ संपला तरी आरक्षण दूरच पण आरक्षणाच्या विरोधात सरकारचे सूर उमटत आहेत. म्हणून धनगर समाजाने जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी श्री.भारत आप्पा डोलारे, सक्षणा सलगर, युवराज शिंदे, बालाजी तेरकर, गोरोबा पंचमहालकर, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, संदीप वाघमोडे,प्रशांत सोनटक्के, देवा काकडे, बालाजी वगरे, प्रा.बालाजी काकडे, सुरेश शिंदे, वसंत करडे,श्रीकांत तेरकर, प्रशांत थोरात, गणेश एडके, शाम तेरकर, ज्ञानेश्वर सोनटक्के, दीपक फोलाणे, सचिन कसपटे, शंकर ठोंबरे, सचिन वाघमारे, सुनील घायाळ, मारुती काकडे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS