उस्मानाबाद – नगराध्यक्ष, नंदु राजे निंबाळकर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

उस्मानाबाद – नगराध्यक्ष, नंदु राजे निंबाळकर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

उस्मानाबाद –  नगराध्यक्ष राजें निंबाळकर यांच्या कुटूंबाच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाच्या कारणावरून अपात्रतेबाबत मागील 10 महिन्यापासून दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे.  या प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाने आज अपात्रतेचा निर्णयाला  स्थगिती दिली आहे. सदरची स्थगिती ही अपिलाची अंतिम सुनावणी पर्यंत कायम असणार आहे, त्यामुळे उस्मानाबाद नगरपरिषद मधील अनिश्चिततेचे वातावरण आता संपुष्टात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस कुरियन जोसेफ आणि जस्टीस भानुमती यांच्या बेंचने निर्णय दिला.  नगराध्यक्ष नंदु राजे निंबाळकर यांच्या विरोधात राजकीय विरोधभावनेतून 2011 पासून तक्रारी सुरू  होत्या.

 

COMMENTS