एक कर, एक देश, अखेर देशात जीएसटी लागू, राष्ट्रपतींनी केला शुभारंभ !

एक कर, एक देश, अखेर देशात जीएसटी लागू, राष्ट्रपतींनी केला शुभारंभ !

ऐतिहासीक जीएसटी आजपासून देशभर लागू झाल्याची घोषणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये केली. त्यामुळे आता देशभर फक्त जीएसटी हा कर लागू होणार आहे. माझ्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात  जीएसटीला गती मिळाली आणि माझ्या राष्ट्रपतीपदाच्या काळात त्याची अंमलबजावणी सुरू झाली हे माझ्यासाठी भाग्याचे आहे असे उद्धगार यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. तर जीएसटीमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होईल, भ्रष्टाचार आणि काळापैसा कमी होईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. जीएसटी लागू झाल्यामुळे परकीय गुंतवणुकीलाही चालना मिळेल असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सोहळ्यात मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.

COMMENTS