एसटी भरतीत माझ्यासह कोणाचाही वशीला चालणार नाही – दिवाकर रावते

एसटी भरतीत माझ्यासह कोणाचाही वशीला चालणार नाही – दिवाकर रावते

येत्या 2 जुलै रोजी होणाऱ्या एसटीच्या ‘चालक तथा वाहक’ पदाच्या लेखी परीक्षेत व त्यानंतरच्या भरतीप्रक्रियेत ” माझ्यासह कोणाचाही वशीला चालणार नाही” उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आथिॆक देवाण-घेवाणीमध्ये अडकू नये. असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

संपू्र्ण भरतीप्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून लेखी परीक्षेनंतर होणारी चालकत्वाची (वाहन चालन चाचणी) चाचणी संगणकीय व मानवहस्तक्षेपरहित असणार आहे,तरी उमेदवारांनी कोणत्याही भुल-थापांना बळी न पडता प्रमाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दयावी असे आवाहन रावते यांनी केले आहे.

कोकणातील  7929 इतक्या चालक तथा वाहक पदासाठी 2 जुलैला लेखी परीक्षा होत आहे.या परीक्षेसाठी 28314 उमेदवार पात्र झाले असून पालघर, ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी व सिंधुदूगॆ या जिल्ह्यातील विविध 27 केंद्रावर हि परीक्षा होणार आहे.सदर परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपयाॆयी स्वरूपाची असून उमेदवारांना  परीक्षा झाल्यानंतर स्वत:च्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत सोबत घेऊन जाता येईल. तरी उमेदवारानी कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या अमिषाला बळी न पडता निॆभिड व मोकळ्या वातावरणात परीक्षा दयावी असे एसटी महामंडळामाफॆत आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS