भायखळा जेलमधील सत्य लवकरच बाहेर येईल – मुख्यमंत्री

भायखळा जेलमधील सत्य लवकरच बाहेर येईल – मुख्यमंत्री

मुंबई – भायखळा कारागृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्ये प्रकरणी पाव आणि अंडी वाटपाचे कारण या हत्येस पुढे केले असताना, इंद्राणी मुखर्जीच्या आरोपाने या हत्याकांडाबाबत अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तसेच या प्रकरणात कारागृह अधीक्षकांना जबाबदार धरले जात असल्याने मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मुंबईत दिले.

कैद्यांना पाव अंडी वाटपावरून झालेल्या मारहाणीत मंजुळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर  वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला. मारहाण करते वेळी महिला पोलिसांनी मंजुळाच्या गुप्तांगावर रॉडने मारहाण केल्याचे तिने म्हटले होते. निर्भया हत्या कांडाप्रमाणे ही हत्या झाल्याचा आरोप तिने या प्रकरणी केला होता.
भायखळा तुरुंगातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाबाबत अनेक कारणे पुढे केली जात आहेत.मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा जेलच्या अधीक्षक मनिष पोखरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांवर हत्येत सहभाग असल्याचे समोर आल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, हे प्रकरण अतिशय गंभीर असून यातील सत्य लवकरच बाहेर येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी या प्रकरणी दिले.

 

 

COMMENTS