कर्जमाफीची आता फॅशनच झाली आहे – व्यंकय्या नायडू

कर्जमाफीची आता फॅशनच झाली आहे – व्यंकय्या नायडू

कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही असे नायडू म्हणाले.

राज्यासह देशभरात सध्या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात येते आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला असताना व्यंकय्या नायडू यांच्या या वक्तव्याने आता शेतक-यांच्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

Loan waiver become fashion nw,loan shud be waived but in extreme situations only,it’s not final solution; hv to take care of farmers:V Naidu  –  ANI

COMMENTS