कर्जमाफीसाठीचे आतापर्यंत  10  लाख  11 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज – सहकारमंत्री  

कर्जमाफीसाठीचे आतापर्यंत  10  लाख  11 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज – सहकारमंत्री  

 

मुंबई –  १६ ऑगस्ट –  शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया  दि. २४ जुलै २०१७ पासून  सुरू झाली आहे.  दि.१६ ऑगस्ट २०१७ पर्यंत  १२ लाख ३८ हजार  शेतकऱ्यांची  नोंदणी झाली असून १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

श्री. देशमुख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकुण  26 हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत असून  त्यात आपले सरकार केंद्र, नागरीक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे.

सदरचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवळपास रोज एक ते सव्वालाख शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे. असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS