कळंब शहरातील वाढत्या रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यात यावा – वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद

कळंब शहरातील वाढत्या रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यात यावा – वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद

कळंब शहरात ग्रामिन भागातुन महिला व विध्यार्थिनी काॅलेज ला कळंब शहरात येतात त्यांना अनेक टवाळखोर अश्लिल भाषेत टिंगल टवाळी,मस्करी,छेडछाड करतात हा प्रकार कळंब शहरात दिवसोंदिवस वाढत चाललेला आहे.कळंब शहरातील बसस्थानक हे टवाळ खोरांचा जणु अड्डाच बनलेला आहे.शिक्षण साठि बाहेरुन येणार्या विध्यार्थिनींना या नाहक त्रासाला ना विलाजाने सामोरे जावे लागत आहे.भिती पोटि विध्यार्थिनी पालकांकडे तक्रार हि करण्यास धजावत नाहित. ना विलाजाने त्यांना हा माणसिक छळ सहन करावा लागत आहे.कळंब शहरामधे विध्यार्थिनी वस्तिगृह व भाड्या ने रुम करुन वास्तव्यास आहेत. खाजगी क्लासेसची संख्या जास्त आहे या मधे ढोकि रोड,मार्केट यार्ड,मोहा रोड या ठिकाणी विध्यार्थिनिंना या रोडरोमियोंकडुन सर्रास त्रास होतो.

या रोड रोमियोचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने अॅन्टी रोड रोमिओ पथक स्थापन करुन मुलिंना संरक्षण द्यावे व विध्यार्थिनी व महिलांना रोड रोमियोकडुन  कुठल्याहि प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा विरभगतसिंग विध्यार्थि परीषदेच्या वतिने तिव्र आंदोलन छेडन्यात येईल असा ईशारा देण्यात आलेला आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष शुभम राखुंडे,संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड,अक्षय मुळिक,अक्षय टेकाळे,दत्तात्रय पवार,प्रतिक गायकवाड,शुभम पकवे,कपील माने आदि उपस्थित होते.

 

COMMENTS