नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला ? पोस्टरबाजीवरुन समर्थकांची वातावरण निर्मिती !

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला ? पोस्टरबाजीवरुन समर्थकांची वातावरण निर्मिती !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. एबीपी माझानं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. येत्या 27 ऑगस्टला राणे भाजपवासी होतील असं त्या बातमीमध्ये म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 27 ऑगस्टला मुंबईत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये राणे यांचा भाजप प्रवेश होणार आहे. असंही एबीपी माझाच्या बातमीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल अजून अधिकृतरित्या कोणी काही बोलले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी लावलेली पोस्टर्स बरचं काही सांगून सागत आहेत.  त्या  पोस्टरवरुन ते पक्षप्रवेशाची वातावरण निर्मिती करत असल्याचं सूचीत होत आहे.

 

 

COMMENTS