काजोलचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

काजोलचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आहे. तिच्या मित्रमैत्रिणीसाठी तीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या पार्टीसाठी काजोलचा मित्र रेयाननं पार्टीमधील खाद्य पदार्थ बनवले आहेत. त्याचं स्पष्टीकरण देताना तो त्याच्यामध्ये काय आहे हे सांगताना दाखवलं आहे. एका पदार्थामध्ये तो बीफ असल्याचं सांगतो. त्यानंतर  काजोल आता मला हे फस्त करायचे आहे असे सांगते.

रेयानच्या बीफच्या वाक्यामुळे काजोलवर सध्या सोशल मीडियातून प्रचंड प्रमाणात टीका सुरू झाली आहे. सध्या देशात बीफ बंदीवरुन प्रचंड वाद सुरू आहे. उत्तर प्रदेशात बीफ खाल्ल्याच्या संशायावरुन अखलाक नावाच्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यूही झाला होता. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.

COMMENTS