यूपीत काँग्रेस- सपा युती तुटली

यूपीत काँग्रेस- सपा युती तुटली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने समाजवादी पक्षासोबतची युती तोडली असून राज्यातील सर्व महापालिका निवडणुका आता काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

राज बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील यापुढील निवडणूक काँग्रेस युतीशिवाय लढेल. समाजवादी पक्ष व इतर कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी केली जाणार नाही.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाबरोबर आघाडी असतानाही दोन्ही पक्षांना अवघ्या 54 जागा मिळाल्या होत्या. 105 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त 7 ठिकाणी विजय मिळवता आला होता. निवडणुकीच्या निकालानंतर राज बब्बर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र आता काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

 

COMMENTS