टोकिओ – कोणत्याही शेतक-यांवर टॅक्स लावण्याचा सरकारचा विचार नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलंय. गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत शेतक-यांवर टॅक्स लावण्याची मागणी काही जणांनाकडून होत आहे. श्रीमंत शेतकरी खूपच कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे कोणालाही टॅक्स लावण्याचा सरकाराच विचार नाही. जेटली सध्या जपानच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या महिन्यात नीती आयोगाचे सदस्य बिबेक डेब्रॉय यांनी काही शेतक-यांवर टॅक्स लावण्याचं सूतोवाच केलं होतं. त्यावर अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. शेतकरी सध्या बिकट स्थितीत आहे. जमीनीचे होल्डिंग आता कमी झाल्यामुळे शेतक-याला फारसे उत्पन्न मिळत नाही असंही जेटली म्हणाले. शेतक-यांवर टॅक्स लावण्याऐवजी त्यांना आता मदत करण्याची गरज असल्याचंही जेटली म्हणाले. केंद्र सरकारची हीच भूमिका आहे. शेतक-यांवर टॅक्स लावण्याचा केंद्र सरकारला अधिकार नाही. प्रत्येक राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल. पण कोणतंही राज्य सरकार शेतक-यांवर टॅक्स लावणार नाही असंही ते म्हणाले.
COMMENTS