खुशखबर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

खुशखबर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 2 रुपया 16 पैसे आणि डिझेलच्या दरात 2 रुपया 10 पैशांनी घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलीटर ७४.७२ रु., तर डिझेलची किंमत ६०.४७ रु. होणार आहे. गेल्या चार आठवड्यांत पेट्रोलच्या किंमतीत झालेली ही पहिली घट आहे.

सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांच्या पाक्षिक आढावा बैठकीत दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरीव वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर तीन रुपयांचा सेस लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले होते.

सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांची पाक्षिक आढावा बैठक झाली. यात डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा आढावा घेऊन दरकपात करण्यात आली.

COMMENTS