माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

चेन्नई – माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चरंजीव कार्थी चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर आज (मंगळवारी) सकाळी सीबीआयने छापा टाकला आहे. चिदंबरम यांच्यासह त्याचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावरही ही धाड टाकण्यात अाली आहेत. तसचं कार्ती यांच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.

सीबीआय विभागाचे अधिकारी आज सकाळी सात वाजता चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतर त्यांनी काही कागदपत्रे तसेच संगणक हार्डडिस्कही जप्त केलेत. चिदंबरम याच्या एकूण 14 ठिकाणी यामध्ये दिल्ली, नोयडा, चेन्नई येथील घरांवर सीबीआयने छापे टाकल्याची माहिती आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान,’ मागच्या महिन्यात कार्थी चिदंबरम आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कार्थी चिदंबरमशी संबंधित असलेल्या या कंपनीवर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

COMMENTS