गाईंनाही आता आधार कार्ड ?

गाईंनाही आता आधार कार्ड ?

बातमीचं हेडिंग वाचून तुम्हाला धक्का बसला ना ! मात्र हे खरं आहे. गाईंची बेकायदा कत्तल रोखण्यासाठी केंद्र सरकार देशातील प्रत्येक गाईला आधारप्रमाणे विशिष्ट प्रकारचा क्रमांक देण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारच्या वतीने काल सुप्रीम कोर्टात ही माहिती देण्यात आली. अशा प्रकारचा विशिष्ट कोड नंबर गाईंना दिल्यामुळे त्यांची तस्करी कमी होईल आणि बेकाय़दा कत्तलही कमी होईल असं केंद्र सरकारला वाटतंय. भारतातून बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात गाईंची तस्करी होत आहे. ती रोखण्यासाठी याचा उपयोग होईल असं केंद्र सरकारचं मत आहे. यासाठी गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली असून त्या समितीने काही सूचना केल्या आहेत. त्यांचे पालन झाल्यास गायींची तस्करी थांबेल अशी माहिती केंद्राने न्यायालयाला दिली.

COMMENTS