संध्याकाळी 7 नंतर काहीही खाऊ नका, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फिटनेस फंडा !

संध्याकाळी 7 नंतर काहीही खाऊ नका, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फिटनेस फंडा !

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने फिटनेस मंत्राचा कानमंत्र दिला आहे. तुम्हाला फिट राहीच असेल तर संध्याकाळी 6.30 ते 7 नंतर काहीही खाऊ नका, आरोग्य पोटावर अवलंबून असते  त्यामुळे पोटाला रात्री विश्रांती द्या असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. “ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र” या कार्यक्रमात आज अक्षय कुमार यांनी हजेरी लावली. त्यावेळी तो बोलत होता.

या कार्यक्रमात अक्षय कुमारने हागणदारी मुक्त महाराष्ट्रासाठी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने जुन्या टेलिफोन बूथच्या धर्तीवर ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे, असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला.  त्याची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक टॉयलेट अॅप बनवावं, ज्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करू शकतील”, असा सल्ला अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मुख्यमंत्र्यांनीही या सूचनेचे स्वागत करुन सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच सरकारकडून हा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

COMMENTS