गुजरातमधील काँग्रेसच्या 8 आमदारांची हकालपट्टी !

गुजरातमधील काँग्रेसच्या 8 आमदारांची हकालपट्टी !

राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा व्हिप झुगारुन भाजपला मतदान केलेल्या काँग्रेसच्या 8 आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे सर्व आमदार शंकरसिंग वाघेला यांचे समर्थक आहेत. आणखी काही आमदारांवर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असतानाही अहमद पटेल यांच्या विजयासाठी पक्षाची पुरती जमछाक झाली होती. मात्र निवडणूक संपताच आणि निसटता का होईना विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास दुनावलेल्या प्रदेश काँग्रेसनं आक्रमक होत पक्षाच्या बंडखोर 8 आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आणखी 6 आमदारांवर अशीच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS