गुजरातमध्ये राष्ट्रवादीची अखेर काँग्रेसला साथ !

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची अखेर काँग्रेसला साथ !

 

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये काँग्रेसचे एकमेव उमेदवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेही रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठिंबा देण्यावरुन मोठा गोंधळ होता. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे गुजरात प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवीदीने कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवले नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर काल पक्षाचे एक आमदार  कंधाल जाडेजा यांनी आपल्याला हायकमांडने भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं आहे. अस वक्तव्य केलं होतं. आज मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पटेल यांनी मात्र पक्षाच्या व्हिपप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचं सांगितलं. तसंच युपीए हा आमचा पार्टनर आहे.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले शंकरसिंह वाघेला यांनी मात्र भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल हे निवडून येणारच नाहीत तर मग त्यांना मतदान कशाला करायचे असे सांगत आपण कोणाला मत केले अप्रत्यक्षपणे सांगितले. आता निकाल आल्यानंतरच पटेल यांच्या पारड्यात किती मते पडली हे स्पष्ट होईल.

COMMENTS