गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट सुरूच, आणखी 3 आमदार भाजपच्या तंबूत !

गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट सुरूच, आणखी 3 आमदार भाजपच्या तंबूत !

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्यावर धक्के बसत आहे. काँग्रेस पक्षाचे तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्यासमोर विजयासाठी मोठं आव्हान उभं ठाकले आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आमदार रामसिंग परमार, छनाभाई चौधरी आणि मान सिंह चौहान या आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर, जामनगरचे आमदार राघव सिंह पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसऐवजी भाजपकडून लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

पुढील महिन्यात राज्यसभेची निवडणूक होणार असून काही महिन्यांतच गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुरूवारी, काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला होता. तर, आज दोन आमदारांनी पक्ष सोडला. आगामी काही दिवसांत आणखी काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे म्हटल जात आहे. याआधी काँग्रेसचे नेते शंकर सिंह वाघेला यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे जाहिर केले होते. त्यानंतर आता त्यांचे समर्थक ही काँग्रेसमधून बाहेर पडत आहे. गुरूवारी, बलवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी.आय. पटेल या आमदारांनी पक्ष सोडला होता.

अहमद पटेल यांना राज्यसभेवर जाण्यासाठी 48 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. अहमद पटेल यांनी आपल्या विजयाचा दावा केला असून वाघेला त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

COMMENTS