पनवेलच्या महापौरपदी डॉ. कविता चोतमोल, तर उपमहापौरपदी चारुशिला घरत यांची निवड !

पनवेलच्या महापौरपदी डॉ. कविता चोतमोल, तर उपमहापौरपदी चारुशिला घरत यांची निवड !

पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाचा मान भाजपच्या डॉ. कविता चौतमोल यांना मिळालाय. तर उपमहापौरपदाचा मान भाजपच्याच चारुशिला घरत यांना मिळाला आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. मात्र शेकाप आघाडीने उमेदवार दिल्यामुळे निवडणुक होण्याची शक्यता होती. मात्र निवडुकीच्या थोडावेळ आधी शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार रविंद्र भगत यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली. भाजपकडे 51 नगरसेवकांचा भक्कम पाठबळ आहे. तर शेकाप आघाडीकडे 27 नगरसेवक आहेत.

COMMENTS