ग्रामपंचायतमध्ये प्रस्थापितांना धक्का !

ग्रामपंचायतमध्ये प्रस्थापितांना धक्का !

ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदार,खासदार,मंत्री यांना  जनतेने सपशेल नाकारले असल्याचे चित्र दिसून आले आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. धनंजय यांनी तब्बल चाळीस ग्राम पंचायतीवर वर्चस्व मिळवले, तर बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर हे पुतण्याला वरचढ ठरले आहेत, आष्टी पाटोद्यात माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजप आमदार भीमराव धोंडे यांना  धोबीपछाड दिली आहे, तर गेवराईत अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना  नाकारत जनतेने बदामराव पंडित यांच्याकडे जास्त ग्रामपंचायत दिल्या आहेत. मजळगावमध्ये मात्र भाजपचे आमदार आर टी  देशमुख यांनी भाजपला यश मिळवून देत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांना हादरा दिला आहे.

बीड जिल्ह्यात 655 ग्राम पंचायतसाठी शनिवारी मतदान झाले,पंकजा मुंडे,धनंजय मुंडे,सुरेश धस,जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती . सर्वाधिक 127 ग्राम पंचायत बीड मतदार संघात होत्या, सोमवारी निकाल लागल्यानंतर बीड मतदार संघात काका जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यतून होमपीच नवगण राजुरी सहित 35 ग्राम पंचायत पुतण्या संदीप याने हिसकावून घेतल्या आहेत तर 40 ग्राम पंचायतवर जयदत्त क्षीरसागर यांनी वर्चस्व मिळवले आहे. निकालानंतर संदीप यांनी काकांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे .

परळी मतदार संघात 74 ग्रामपंचायत पैकी 40 ग्राम पंचायतीवर धनंजय मुंडे यांनी कब्जा मिळवला तर 34 ग्राम पंचायत पंकजा यांच्या ताब्यात आल्या आहेत . गोपीनाथय गाद आणि परळी साखर कारखाना असलेल्या पांगरीच्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व मिळवीत धनंजय यांनी बहीण पंकजा याना जोरदार धक्का दिला आहे .

अष्टीमध्ये सुरेश धस यांनी 100 पैकी 70 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवीत विद्यमान आमदार भाजपचे भीमरावं धोंडे यांना जबर हादरा दिला आहे . गेवराई मध्ये माजी मंत्री बादमर पंडित यांनी 38 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवीत अमरसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार या दोन्ही विद्यमान आमदारांना धक्का दिला आहे .

माजलगाव मध्ये भाजपचे आमदार आर टी  देशमुख यांनी 35 ग्राम पंचायत ताब्यात घेत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे .

बीड जिल्ह्यात ग्राम पंचायत चे लागलेले निकाल पाहता प्रस्थापित जे पुढारी आहेत,विद्यमान आमदार खासदार मंत्री आहेत त्यांना जनतेने स्वीकारले नसल्याचे चित्र दिसून आले आहे .

 

 

COMMENTS