वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला सुरुवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या 1 जुलै पासून संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे. जीएसटी लागू करण्याकरिता कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न व्हावा त्याकरिता सरकार आज रात्री 11 वाजता एक ‘मेगा रिहर्सल’ करणार आहे.
अर्थ मंत्रालयाने एक वॉर रूम सुद्धा बनवला आहे. ज्यात सरकारी अधिकारी जीएसटीच्या समस्यांवर विचारविनिमय करतांना दिसतील. त्याचबरोबर फोन लाईन, संगणके आणि तंत्रज्ञानात कुशल असलेल्या युवा अधिकाऱ्यांनी हा वॉर रूम भरलेला राहणार आहे.
सीबीईसी प्रमुख वनजा एन सरना यांनी मंगळवारी सांगितले की, मंत्रालयाने जीएसटीसाठी अभिप्राय आणि कृती खोली बनविले आहे. ज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या कोणत्याही समस्यांना सोडवण्याचे काम एक रिसोर्स केंद्र करणार. तसेच, हे केंद्र सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करणार आहे.
30 जून रोजी संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि एचडी देवेगौडा सुद्धा उपस्तिथ राहणार आहे. मात्र विरोधी पक्षाने अजूनपर्यंत या कर्यक्रमाला उपस्तित राहण्याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष उद्या पर्यंत आपला निर्णय जाहीर करणार आहे.
COMMENTS