वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात वाजत-गाजत होणार आहे. केंद्र सरकार यासाठी विशेष सोहळा आयोजीत केला आहे. मात्र काँग्रेसने या सोहळावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनात सहभागी होणार नाही असे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
वस्तू व सेवा कराच्या रूपात 1 जुलैपासून देशभरात एक कर रचना अस्तित्वात येणार असून पूर्वसंध्येला तिच्या मुहूर्तासाठीची तयारीही करण्यात आली आहे. संसदेच्या वर्तुळाकार मध्यवर्ती सभागृहात यानिमित्ताने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे अध्यक्ष तसेच अनेक ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 50 वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य सोहळा साजरा झाला होता.
जीएसटीच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस सहभागी होणार की नाही याविषयावर गुरुवारी पक्ष नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेअंती काँग्रेसने अधिवेशनात सहभागी न होण्याचे ठरले. यापूर्वी तृणमूल काँग्रेसनेही या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता जीएसटी ही काँग्रेसची संकल्पना असून यावरच पक्षाने बहिष्कार टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
COMMENTS