जेनरिक औषधांसाठी लवकरच कायदा करणार – पंतप्रधान मोदी

जेनरिक औषधांसाठी लवकरच कायदा करणार – पंतप्रधान मोदी

देशातील डॉक्‍टरांनी रुग्‍णांना जेनरिक औषधे द्यावीत. यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान गुजरात दौर्‍यावर असून दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. आज येथील एका रुग्‍णालयाचे त्यांच्या हस्‍ते लोकार्पण झाले.

सोमवारी सूरतमध्ये मल्टीस्पेशलिटी रुग्णालय, डायमंड प्लान्टचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. कतारगाममधील किरण मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचे त्यांनी उद्घाटन केले. हे रुग्णालय पाटीदार समाजाच्या एका ट्रस्टने बांधले आहे. 400 कोटी रुपये खर्च करुन हे रुग्णालय तयार करण्यात आले. याप्रसंगी मोदींनी केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रात सुरु केलेल्या विविध योजना सांगितल्या. स्वस्तात उपचार मिळावे यासाठी लवकरच कायदा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी पुढे म्‍हणाले, ‘आपण जे काम हाती घेतले आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारीही घेतली पाहिजे. मी भूमिपूजनाला आल्यावर सांगितले होते की या रुग्‍णालयाचे उद्‍घाटनही मीच करणार आहे. आज मी ते करत आहे. याला माझा घमेंड समजण्यात आले होते. मात्र मी ते मानत नाही. सांगण्याची बाब म्‍हणजे आपले काम पूर्णत्‍वास नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे’.

‘सर्वांच्या नजरेत जरी मी पंतप्रधान झालो असलो तरी सुरत त्याला अपवाद आहे. या ठिकाणच्या परिवारभावाने कधी ना कधी माझी काळजी केली आहे. यापेक्षा कोणतेही मोठे भाग्य नाही. पदाने कोणीही मोठा होत नाही तर कतृत्‍वाने मोठा होतो’, असे नरेंद्र मोदी यावेळी म्‍हणाले.

COMMENTS