बारामती – राज्यामध्ये दुबार पेरणीचं संकटं आहे. आधिच अडचणीत असलेल्या शेतक-यांवर हे दुहेरी संकट आहे. मात्र हवामान विभागने आता नव्याने पाऊस पडेल असं भाकित केलंय. त्यांचं भाकित खरं ठरावं. ते जर खरं ठरलं तर हवामान विभागाच्या तज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर खालीन असं वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते. जागतीक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज पवार आले होते.. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार त्यांच्या हस्ते देणात आले…
COMMENTS