हमरा सांसद लापता है, वाराणसीमध्ये लागले पोस्टर !

हमरा सांसद लापता है, वाराणसीमध्ये लागले पोस्टर !

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे बेपत्ता असल्याचं पोस्टर त्यांच्या अमेठी मतदारसंघात झळकलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात स्थानिक खासदार नरेंद्र मोदी बेपत्ता असल्याची पोस्टर लागली आहेत. पोस्टरवर लापता, वाराणसी सांसद असं लिहिलंय. तसंच ‘जाने वह कौन सा देश जहाँ तुम चले गये 1 असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

पोस्टर लागल्यामुळे स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तातडीने त्यांनी ते पोस्टर उतरविले आहे. पोस्टर कुणी लावले याचा मात्र अजून तपास लागू शकलेला नाही. आमचे खासदार  कुठे गेले हे समजलं नाही तर नाईलाजाने आम्हाला खासदार बेपत्ता झाल्याची तक्रार करावी लागेल असंही पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांही हेही मतदारसंघातून बेपत्ता असल्याचे पोस्टर अमेठी मतदारसंघात लागलं होतं. राहुल गांधी यांना शोधून आणणाराला बक्षीस देण्याचंही जाहीर करण्यात आलं होतं.

COMMENTS