…. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरही राष्ट्रवादी करणार दावा ?

…. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरही राष्ट्रवादी करणार दावा ?

गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबध चांगलेच ताणले गेले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन पैकी एका आमदाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र दुस-या आमदाराने भाजपला मतदान केले आणि बाहेर आल्यावर तसे सांगितलेही. त्यामुळे दोन्ही पक्षात कटूता निर्माण झाली आहे. खरंतर राष्ट्रवादीने सांगूनही त्यांच्या एका आमदाराने काँग्रेसला मतदान केले नाही. त्या आमदराला प्रफुल्ल पटेल यांची फूस असल्याचा काँग्रेसला संशय आहे. त्यामुळेच काँग्रसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली. राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा आरोप केला.

काँग्रेसच्या आरोपामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादीने मग सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला. त्यावरुन दोन्ही पक्षातली दरी आणखीच वाढली. आता आगामी काही दिवसात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. राणेंच्यासोबत त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे आणि त्यांचे निकटवर्तीय एक दोन आमदारही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

असं झाल्यास आपोआप काँग्रेसचं संख्याबळ कमी होईल. सध्या काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. राणेंसोबत काँग्रेसचे 3 आमदार गेले तर त्यांचे संख्याबळ 39 वर येईल. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरही राष्ट्रवादी दावा करण्याची शकयता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. याची खंमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

COMMENTS