‘त्या’ तरूणांच्या पाठीशी मजबूतीने उभे राहू – शरद पवार

‘त्या’ तरूणांच्या पाठीशी मजबूतीने उभे राहू – शरद पवार

मुंबई –  सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांना सोबत शरद पवार यांनी आज संवाद साधला आहेत. ‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जे लिहितायेत त्यांना दमदाटी केली. एका तरूणाला तर कस्टडीमध्ये ठेवलं गेलं. कुठल्या आधारावर केलं. मुख्यमंत्री कार्यालयात एक ओएसडी आहेत त्यांच्या माध्यमातून हे होत आहे. सरकारी अधिकारी असं करतात हा शासकीय शिस्तीचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. नियुक्त आधी राजकीय पक्ष संबंधित होते. ते अधिकारी असताना राजकीय पोस्ट कसे लिहितात. मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. त्या संबंधित अधिकारी कठोर कारवाई करावी. असं शरद पवार यांनी  म्हटलं आहे.

‘या तरूणांच्या पाठीशी आम्ही मजबूतीने उभे राहू. काही कायदेशीर सल्लागारांना सोबत घेऊन त्यांना आम्ही मदत करू,’ असंही शरद पवारांनी म्हटलंय.

मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर लिहिणाऱ्या जवळपास 35 जणांना सरकारच्या सायबर सेलने नोटीसा पाठवल्या आहेत.  त्याविरोधात सोशल माध्यमातून तीव्र संताप व्यक्त होतेय.

‘यवतमाळ किटकनाशक औषधे विषयी विदर्भात असलेले सीएम यांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.  अशी टीका पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. दिवाळी पूर्वी शेतकरी कर्जमाफी मिळेल का याबाबत शंका वाटते, असेही पवार म्हणाले.

बीएमसी सेनेनी केले ते फक्त सेनेनी केले असे नाही. या आधी भाजपाने पुणे, पिंपरी येथे फोडाफोडी आधी केले. भाजपानी जे पेरले ते उगवते आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईत नगरसेवक आमचेच राहतील. ते फुटणार नाहीत. असे पवार म्हटलं आहे.

COMMENTS