राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर

राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर

राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून हा संप पुकारण्यात आला आहे.

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन देऊनही मानधन वाढीची मागणी पूर्ण केलेली नाही. एप्रिल महिन्यात शासनाने मानधन वाढीचे आश्वासन दिले होते.  इतर राज्यांमध्ये जास्त मानधन आहे, त्याप्रमाणे वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांतर्फे निदर्शने करण्यात येणार आहे.

 

 

COMMENTS