सरकारी कार्यालयातील महिलांनी पुरुषांना राखी बांधावी, ‘ते’ परिपत्रक अखेर रद्द !

सरकारी कार्यालयातील महिलांनी पुरुषांना राखी बांधावी, ‘ते’ परिपत्रक अखेर रद्द !

कुणी काय खावे ? कुणी कुठले ड्रेस घालावे ? कुणी काय म्हणावे ? कुणी काय म्हणू नये ? असे वादाचे प्रकार आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. हे वाद कधी धार्मिक संघटनांकडून निर्माण केले जात तर कधी सरकारही असे वादग्रस्त निर्णय घेताना दिसतं.

आता हेच बघा ना ! दिव  आणि दमन प्रशासनाकडून असचं एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्यामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत दीव आणि दमण मधील सरकारी कार्यालयातील महिलांनी त्याच कार्यालयातील पुरुषांना राखी बांधण्याचं बंधन घालण्यात आलं होतं. उपसचिवांच्या सहीने ते परीपत्रक काढण्यात आलं होतं. ते परीपत्रक सोशल मीडियावर आलं आणि त्याच्यावर चौफेर टीका होऊ लागली. त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली. त्यामुळे ते परिपत्रक अखेर मागे घेण्यात आलं.

पुढच्या आठवड्यात सोमवारी रक्षाबंधन आहे. त्या दिवशी सरकारी कार्यालयातीत सण साजरा करा. कार्यालयातील महिलांनी पुरुषांना राखी बांधावी असे आदेश त्या परिपत्रकातून देण्यात आले होते. एवढच नाही तर 7 तारखेला सण साजरा केला की नाही. किती जण उपस्थित होते याची तपासणी 8 तारखेला केली जाईल असंही त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. अखेर वाद निर्माण झाल्यानं ते परीपत्रक रद्द करण्यात आलं होतं.

COMMENTS