10 हजार मदतीच्या नव्या जीआरने उद्धव यांचे समाधान – चंद्रकांत पाटील

10 हजार मदतीच्या नव्या जीआरने उद्धव यांचे समाधान – चंद्रकांत पाटील

मुंबई – 10 हजार रुपयांचं कर्जाचं ॲडव्हान्स देण्यासंदर्भात जो जी आर काढण्यात आला यासंबधी आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी 10 हजार मदतीच्या नव्या जीआर वर  उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या  आग्रहामुळे आणि शेतकर्यांच्या भावनांचा विचार करता… आम्ही काल जे 10 हजार रुपयांचे ॲडव्हान्स कर्ज दिले जाणार आहे. त्याच्या निकषांमध्ये सुधारणा केल्या. यावर उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्तं केलं. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

अधीक शेतकर्यांचं समाधान… आणि राज्याची आर्थिक स्थिती. यांचं समन्वय आपल्याला साधला पाहीजे. राज्याची आर्थिक स्थिती पहाता… अन्य राज्यांनी केलेली कर्जमाफी पाहाता. यामधून काही मार्ग काढला पाहीजे. राज्याचं आर्थिक समतोल राखण्यासाठी आमचं एकमत झालं. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील  म्हणाले की,  30 जून 2016 पर्यंतची थकीत कर्जमाफी आणि 1 लाखापर्यंत कर्जमाफी केली. तरी 80% शेतकरी कव्हर होतो.  सात बोरा कोरा तो जवळ जवळ 80% शेतकर्यांचा सात बारा कोरा होतोय. ज्यांनी नियमीत कर्ज भरलंय. त्यांची हीच भावना असते की मी नियमित कर्ज भरलं ही चूक केली काय…? तर नियमित कर्ज भरणार्यांना काही पॅकेज देऊ. ही पण मांडणी त्यांच्यापुढे केली. त्याला त्यांनी मान्याता दिली. अमाउंट आणि पॅकेजच्या बाबतीत मागेपुढे चर्चा होईल. यावर उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मी माझ्या सहकार्यांशी बोलून तुम्हाला सांगतो.

आता आम्ही बैठकीत वेळ घालवणार नाही… अंमलबजावणीला लवकच सुरवात होईल. त्या प्रमाणे मी सर्वांना भेटतोय… तसंच शरद पवारांनाही भेटणार आहे. सर्वांशीच चर्चा करूनच आम्ही अहवाल तयार करणार आहोत. तो तयार झाला की आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करू. मग मुख्यमंत्री त्या अहवालावर अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून योग्य निर्णय जाहीर करतील. असे चंद्रकांत पाटीलांनी स्पष्ट केले.

COMMENTS