नांदेडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ?

नांदेडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ?

नांदेड – नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीसाठीचं मतदान संपल आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 60 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे. गेल्यावेळी 54 टक्के मतदान झालं होतं. यावेळी ते 60 टक्क्यांच्या आसपास आहे. यावेळी जवळपास 6 टक्के मतदान वाढलं आहे. या वाढीव टक्क्यांचा फायदा कोणाला होता ते उद्या कळणार आहे. नांदेड महापालिकेत 20 प्रभागातील 81 जागांसाठी मतदान झालं. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

COMMENTS