2029 नंतर राजकारणातून रिटायर्ड होणार – सुप्रिया सुळे

2029 नंतर राजकारणातून रिटायर्ड होणार – सुप्रिया सुळे

सातारा – मी बारामती मतदारसंघात समाधानी आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मी बारामतीतून लढणार आहे. त्यानंतर कदाचित रिटायर्ड होईन’, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये झालेल्या युवा संवाद कार्यक्रमानंतर खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राष्ट्रवादीची भुमिका काय असेल, या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, “रोज रूसणाऱ्या बायकोकडे नवराही फारसे लक्ष देत नाही. सध्या शिवसेनेची तशी अवस्था झाली आहे. गेली 3 वर्षे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार हेच ऐकत आहोत. आता तो जोक झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भुमिकेचा येथे प्रश्नच येत नाही. अगदी ब्रम्हदेव खाली आला तरी आम्ही भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्न येत नाही आणि एकटी सुप्रिया सुळे याबाबत निर्णय करू शकत नाही.

COMMENTS