सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
12 वर्षांनंतर राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने व्यासपीठावरील आसनव्यवस्था करण्यात आलेय. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या फक्त दोन खुर्च्यांचेच अंतर आहे.उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आसनव्यवस्था आहे.
COMMENTS