नारायण राणे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

नारायण राणे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्यासह एका नामांकित विकासकाविरोधात 300 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनायातर्फे (ईडी) सुरु असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आली आहे. राणे आणि भाजप यांच्यामधील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे ही चौकशी बंद केली गेल्याचा आरोप करत या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे.

राणे यांच्याविरोधात थांबविण्यात आलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आणि चौकशीचा अंतिम अहवाल संबंधित कनिष्ठ न्यायालयात विशिष्ट कालावधीत सादर करण्याचे आदेश ‘ईडी’ला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.  11 ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.  यामुऴे राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS