मुंबई – नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन झाले आहे. नारायण राणे यांनी कुटुंबियांसह श्री गणेशाची पूजाअर्चा केली.
‘गणेश चतुर्थीच्या निमित्तानं महाराष्ट्रतील तमाम नागरिकांना शुभेच्छा. गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रात कधीही दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती येऊ नये. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणरायाने सुखी आणि समाधानी ठेवावे.’ असे साकडे नारायण राणे यांनी गणरायाला घातले.
गणरायावर भक्ती म्हणून मला शक्ती मिळते. गणरायाकडे काही मागत नाही, कारण गणरायाने मला खूप काही दिलंय. जे मिळालं ते गणरायाची कृपा आहे.’ असं सूचक विधान राणे यांनी नव्या राजकीय वाटचाली निमित्तानं केलं. महाराष्ट्राला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची बुद्धी मला गणराय देतील.’ असे नारायण राणे म्हणाले.
COMMENTS