अल कायदाच्या दहशतवाद्याला दिल्लीतून अटक

अल कायदाच्या दहशतवाद्याला दिल्लीतून अटक

अल कायदाच्या एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचे नाव रजा उल अहमद असे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अल कायदाने 15 ऑगस्टपूर्वी दिल्लीसह अन्य मोठ्या शहरांना टारगेट करण्याची जबाबदारी या दहशतवाद्यावर सोपवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी रजा उल अहमद बांग्लादेशमध्ये अल कायदाच्या एबीटी (अंसारुल्ला बांग्ला टीम)  नामक शाखेचा सदस्य आहे. पश्चिम बंगाल पोलीसदेखील या दहशतवाद्याच्या शोधात होते. सध्या त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

 

 

 

COMMENTS