कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकऱी गेल्या काही दिवसा पासुन आंदोलन करीत आहे. यातच कर्नाटकमधील एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून केवळ एक रुपया मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बासवराज होसामानी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कोप्पल जिल्ह्यातील किदादुरू गावात शेती करतात. पिकांची नुकसान भरपाई म्हणून 10 हजार 800 रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्याने खात्यातील पैसे तपासल्यावर शेतकऱ्याला धक्काच बसला. त्याला नुकसान भरपाई म्हणून केवळ 1 रुपया मिळाला होता, अशी माहिती बासवराज या शेतकऱ्याने दिली.
COMMENTS