पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जीत पटेल यांच्यानंतर देशपातळीवरील आणखी एक मोठे पद गुजरातच्या व्यक्तीकडे जाणार आहे. देशाचे पुढचे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून गुजरात केडरचे अधिकारी अचल कुमार ज्योती हे असणार आहेत. विद्यमान मुख्य निवडणुक आयुक्त नसीम झैदी हे याच महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर ज्योती यांची निवड होणार आहे. मोदी सरकारने ज्योती यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. ज्योती हे 64 वर्षांचे असून त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ज्योतीकुमार हे नरेंद्र मोदी यांचे विश्वासू समजले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्योती हे गुजरातचे मुख्य सचिव होते.
Newer Post
जीएसटीमुळे घरगुती गॅस सिलिंडर महागला
COMMENTS