पनवेलमध्ये फुलले कमळ, शिवसेनेचा सुपडा साफ!

पनवेलमध्ये फुलले कमळ, शिवसेनेचा सुपडा साफ!

पनवेलमध्ये कमळ फुलले असताना शिवसेनेला भोपळाही फोडता न आल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नव्यानंच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेवर शेकापचं वर्चस्व राहणार की भाजपचा झेंडा फडकणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जोरदार आघाडी घेत भाजपनं सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. एकूण 78 जागांपैकी भाजपनं 51 जागांवर आघाडी घेतली असून शेकापला केवळ  23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर मुंबई, ठाण्याला लागून असलेल्या पनवेलमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही. हे निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक मानले जात आहेत.

COMMENTS