पुणे महापालिकेत अवतारले शिवाजी महाराज आणि मावळे !

पुणे महापालिकेत अवतारले शिवाजी महाराज आणि मावळे !

पुणे – आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चक्क शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह अवतरले. विषय होता कोथरुडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा. डीएमआरसीच्या अहवालानुसार याठिकाणी मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. मात्र त्याच जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं आधीच मंजूर केलेला आहे. या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण्याबाबत दुमत आहे.

याच पार्श्वभूमिवर कोथरूडमधील जागेवर शिवसृष्टी उभारण्याच्या मागणीसाठी माहापालिकेतील विरोधक एकवटले होते. मनसेचे नगरसेवक तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पोशाख धारण करून अगदी वाजत गाजत महापालिकेत आले. सभागृहात त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काॅंग्रेसची देखील साथ मिळाली. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा शिवसृष्टी झालीच पाहिजे तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी दुमदुमून गेली. या गदारोळातच ज्या कारणासाठी आजची विशेष सभा बोलावण्यात आली होती त्या शहराच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचं प्रकाशन झालं. विरोधकांनी मात्र शिवसृष्टीचा विषय आधी चर्चेला घेण्याची मागणी लावून धरली.

 

 

COMMENTS