कोडूनगल्लूर, केरळ – देशातील काळा पैसा नष्ट व्हावा आणि भ्रष्टाचाराला पायबंद बसावा, देशात पसरलेल्या बनावट नोटांचा सुळसुळाट कमी व्हावा यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकराने नोट बंदी सारखा निर्णय घेतला. या निर्णयाच्या यश अपयशाबद्दल वाद होऊ शकतो. मात्र त्या निर्णयाच्या हेतूला हरताळ फासणारं कृत्य चक्क भाजपच्याच नेत्यानं केल्याचं उघड झालंय. केरळमधील युवा मोर्चाचा नेता असलेल्या राकेश इराकेरी या नेत्याला बनावट नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून बनावट नोटा छापणारी मशीन, त्यासाठी लागणारं साहित्य आणि दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. राकेश हा कोडनगल्लूर भागात व्याजाने पैसे देण्याच्या व्यवसाय करतो. त्या भाऊ राजेश याच्या घरातूनही बनावट नोटा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. राजेश मात्र अजून फरार आहे. या प्रकारांमुळे केरळमध्ये भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे.
COMMENTS